Pages

Sunday, April 22, 2012

एक गाव जंगलतोडीकडून पर्यटनाकडे

नागपूर : वन खाते आणि जंगलाच्या आजूबाजूला वसलेल्या गावांमध्ये एक संघर्ष दिसून नेहमीच दिसून येतो. मात्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील नागझिरा येथे वनखात्याने संपूर्ण गावाला एको फ्रेंडली पद्धतीने जंगलावर निर्भर करून मैत्रीची सुरूवात केली आहे.

पिटेझरी या गावातच नागझिरा अभयअरण्याचे एक गेट आहे. आत गेल्यावर तुम्हाला कंपाऊंड दिसून येईल. हे कंपाऊंड दिसून आलं असलं तरी, तर वनखाते आणि गावकरी यांच्यातली खरी मैत्री कंपाऊंडपासून सुरू होते. या कंपाउंडमध्ये १० राहुट्या आहेत. ज्या वनखात्याने या गावाला दिल्या आहेत. वनखात्याने जंगलाच्या आत हे कंपाउंड बांधून दिले.

गावात या जंगलासाठी ही समिती पण गठीत केली आहे. ज्यांना आपल्याच गार्डचे ऑफिस दिले आहे. यात फॉरेस्ट गार्डचाही समावेश आहे. या समितीला या राहुट्या येणाऱ्या पर्यटकांसाठी चालवायला प्रशिक्षण दिले आहे. या राहुट्यांमध्ये दोन ते आठ बेड आहेत. या राहुट्या एका हॉटेलासारख्याच आहेत.

हॉटेलासारख्या या राहुट्या बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे गावकऱ्यांना रोजगार मिळणार आहे.

जंगलात वनखात्याची एक रिकामी रूम होती, त्याचं रूपांतर स्वयंपाकघरात करण्यात आलं आहे. राहुट्यांमध्ये राहणाऱ्या पर्यटकांसाठी गावातील बायका येथे आता जेवण बनवतात. यामुळे गावातील महिलांना नवा रोजगार उपलब्ध झाला आहे. या पर्यटकांना भांडी आणि फ्रीजसारख्या वस्तू वनखात्याने दिल्या आहेत.

पिटेझारी गावात यायच्या आधीच खरं तर जंगल सुरु होतं. यामुळे ५०० लोक वस्तीचं पिटेझारी गाव जंगलावर अवलंबून आहे. मात्र पैशांसाठी जंगल तोड होत होती. जंगल तोडून साकोलीला जाऊन लाकडे विकणे. हे खास या गावातील लोकांचे काम होते. मात्र आता ते थांबवणं. जंगलतोडीचं नुकसान त्यांना समजावण्यात आलं आहे.

या बरोबर त्यांना याच जंगलाला न तोडता तिथेच काम दिल्या जात आहे. वनखात्यानं पर्यटकांना जंगलची सफर घडवून आणण्यासाठी १२ जीप गाड्या खरेदी केल्या आहेत. पण या गाड्यांवरील ड्रायव्हर हे गावातीलच आहेत. यामुळे गावकऱ्यांच्या रोजगारात भर पडली आहे. गावातील जंगलतोड करणारे १२ तरूण आता, ड्रायव्हिंगकरून आपलं घर चालवतात.

या बारा तरूणांसह जंगलाची माहिती देणारा गाईड हा गावातीलच आहे. पण यापेक्षा जंगलातील चोरीतून जास्त पैसे मिळायचे, असं एका तरूणाने सांगितलंय.

या गावात सुखसोयी उपलब्ध झाल्यामुळे येणारे प्रवासी वाढले आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे इतर व्यवसायही वाढले आहेत. गावकऱ्यांनी गेटच्या बाहेरही दुकानं थाटली आहेत.

No comments:

Post a Comment